Take a fresh look at your lifestyle.

गौतम अदानींनी यावर्षी कमावली ‘एवढी’ संपत्ती; अंबानी, मस्क आणि बेझोसलाही सोडले पाठीमागे

दिल्ली :

Advertisement

यावर्षी 2021 बद्दल बोलायचे झाल्यास भारतीय व्यावसायिकांनी जगभरात सर्वाधिक संपत्ती वाढविली आहे. गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती यावर्षी इतकी वाढली की, त्यांनी जगातील दोन श्रीमंत उद्योजक जेफ बेजोस आणि एलोन मस्क तसेच मुकेश अंबानी यांनाही मागे सोडले.

Advertisement

ब्लूबमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, यावर्षी 2021 मध्ये गौतम अदानी यांची संपत्ती 1620 कोटींनी वाढली असून आता त्यांची संपत्ती 5 हजार कोटींवर गेली आहे. अदानीच्या संपत्तीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी पोर्टपासून ते अदानी पॉवरपर्यंतच्या अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आहे.

Advertisement

अदानी समूहाची एक कंपनी वगळता उर्वरित सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये यावर्षी 2021 मध्ये 50 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

संपत्ती वाढीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनादेखील पाठीमागे टाकले आहे. यावर्षी गौतम अदानीची संपत्ती 1620 कोटी डॉलरने वाढली आहे, तर रिलायन्सचे प्रमुख अंबानी यांची संपत्ती 810 कोट डॉलरने वाढली आहे. अर्थात एकूण संपत्तीच्या बाबतीत अंबानी यांच्यापेक्षा अदानी खूपच मागे आहेत.

Advertisement

यावर्षी अडाणी टोटल गैसमध्ये 96%, अडाणी एंटरप्राइजेजमध्ये 90%, अडाणी ट्रांसमिशन मध्ये 79% तेजी दिसून आली आहे. अडाणी पॉवर, अडाणी पोर्ट्स एंड सेजमध्ये 52% तेजी दिसून आली. अडाणी ग्रीन एनर्जीमध्ये मागच्या वर्षी 500% तेजी आली आहे. तर यावर्षी 12% तेजी आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply