Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… ‘या’ तारखेला होणार MPSC ची परीक्षा

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार (MPSC Exam New Date) आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे,  आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. (Maharashtra MPSC Exam 2021 New Date Out Exam will be on 21st March Maha Govt Uddhav Thackeray)

Advertisement

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली होती.

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या युवकांच्या करिअरचा विषय युवकांप्रमाणे शासनासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे रस्त्यावर उतरू नका तुमचे करिअर आणि तुमची आरोग्य विषयक सुरक्षितता आमच्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना कोरानाच्या दडपणाखाली येऊन परीक्षा द्यावी लागू नये हीच प्रामाणिक इच्छा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्‍ट केले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply