Take a fresh look at your lifestyle.

BLOG : शेतकरीहित आणि विकास बाजूलाच; गेट उघडण्याच्या ‘किरकोळ’ मुद्द्यावरू राजकारण जोमात..!

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि बाजार समिती कशासाठी असते? प्रशासकीय अडवणुकीसाठी की सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक विकास घडवण्यासाठी? आपल्याला असा प्रश्न नसेल पडला तर, बाजार समितीचे गेट उघडण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय बातम्या ‘अराजकीय’ पद्धतीने वाचा. मग यातला फरक आणि भेद आपल्याला नक्कीच समजेल.

Advertisement

तर, वाचक बंधू-भगिनींनो, हा मुद्दा बाजार समितीशी निगडीत असल्याने आपण त्यावरच बोलूयात की.. नाहीतरी, नगर शहरातील ‘चकाचक रस्ते’ हा वेगळा आणि महत्वाच्या लेखाचा भाग आहेच की. तीन वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कोणत्यातरी अधिकाऱ्यांच्या डोक्यात आले की, अहमदनगर बाजार समितीचे एक गेट बंद करून वाहतुकीचे नियंत्रण शक्य आहे. मात्र, नंतर दहाच दिवसात स्पष्ट झाले की, हा निर्णय 100 टक्के चुकीचा होता. त्यावर कार्यवाही करायला मग थेट 3 वर्षे गेली. या कालावधीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना झालेला मनस्ताप आताच्या श्रेयवादाच्या बातमीमध्ये कोणाच्याही लेखी नाही..!

Advertisement

गेट उघडण्यासाठी बाजार समिती प्रशासन, शहर शिवसेना आणि नगर तालुका महाविकास आघाडी यांच्या कडून प्रयत्न झालेत हे मान्य. त्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल आभार. मात्र, आता गेट उघडल्यावर मीच हे ‘महान कार्य’ केल्याचे सांगणे म्हणजे कर्तव्यदक्षता आहे का? मुळात बाजार समितीमध्ये हमीभाव अजिबात मिळत नाही, शेतकऱ्यांना राहायला आणि शौचालयाची व्यवस्थित सोय नाही, आणि मुख्य म्हणजे शेतकरी हिताला कितपत महत्व आहे हे मुद्दे जास्त महत्वाचे नाहीत का?

Advertisement

परंतु, हे मुद्दे बासनात गुंडाळून सर्वच राजकीय पक्ष आणि बाजार समिती प्रशासन सध्या गेटच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. मूळ मुद्द्याला किंवा समस्येला बगल देऊन किरकोळ मुद्दे दामटण्याचा तर हा प्रयत्न आपणास वाटत नाही ना? बाजार समिती म्हणजे काही जादूची कांडी नाही. मात्र, तिथे शेतकरी हिताला प्राधान्य मिळायला पाहिजे, इतकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यावर एकही पक्ष किंवा विकासाभिमुख नेतृत्व अजिबात बोलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.

Advertisement

गुरुवारी सकाळी आमदार संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, बहिरू कोतकर, राजेंद्र बोथरा, उद्धव कांबळे, अविनाश घुले, सचिव अभय भिसे, संजय काळे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे गेट उघडण्यात आले. गेट एकतर्फी बंद केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. माजी आमदार शिवाजी कर्डिले व बाजार समितीचे हे गेट उघडण्यासाठी प्रयत्न चालू होते. कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकामुळे याला वेळ लागला. गुरुवारी सकाळी हे प्रवेशद्वार उघडे करण्यात आले, असे काही मंडळीनी असे भासवले. बाजार समिती ही व्यापाऱ्याच्या विरोधात निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, समिती व्यापारी हिताचे निर्णाय घेत असतो. अवजड वाहतुकीसाठी लावलेले बॅरीकेटसही लवकर काढले जातील, असे सभापती घिगे यांनी याबाबत सांगितले आहे.

Advertisement

तर, शिवसेनेने अनेक वेळा हे गेट उघडण्याविषयी निवेदन दिले होते. जानेवारी महिन्यातच तोंडी आदेश देण्यात आले होते. आदेश आल्यानंतर गेट उघडण्यास वीस दिवस का लागले? बाजार समितीला शेतकऱ्यांचे हित दिसत नाही, परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार असल्याचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी याबाबत म्हटले आहे की, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी तिघांनीही वाहतूक नियंत्रण कमिटीमध्ये आवाज उठवून आम्ही केलेल्या मागणीला उत्तम प्रतिसाद दिला. याबाबत मार्केट कमिटीचे सचिव यांना दोन दिवसापूर्वी पत्र दिले होते. शिवसेनेच्या अखंड प्रयत्नामुळे बाजार समितीचे गेट खुले झाले आहे.

Advertisement

सर्वांनी गेट उघडण्याचे दणक्यात श्रेय घेतले आहे. एकही पक्ष किंवा नेता यात पाठीमागे नाही. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी) राज्यात सरकार असतानाही नगर बाजार समितीमध्ये शेतमालास हमीभाव का मिळत नाही, यावर सगळेच अर्थपूर्ण शांत तर नाहीत ना..?

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply