Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मंत्र्यांनी ऑन द स्पॉट बदलला प्रशासनाचा निर्णय; ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाउन हटवला

मुंबई :

Advertisement

राज्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रुग्णवाढीमध्ये सध्या नागपूर आघाडीवर असलं तरी आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही रुग्ण वाढत आहे. अकोला जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, येथे दररोज शेकडो रुग्ण नव्याने आढळत आहेत.

Advertisement

नव्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्यामुळे येथे कोरोनाला थोपवणे अवघड जात आहे. त्यामुळे अकोला या जिल्ह्यात लॉकडाउन केल्याची बातमी समोर आली होती.

Advertisement

मात्र आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एका मंत्र्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अकोला जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन (lockdown) लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यांनी तसे आदेश अकोला जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Advertisement

बेधडक वृत्ती आणि धकाकेबाज पद्धतीने काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी रद्द केला. जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या बच्चू कडून यांनी ही माहिती दिली.

Advertisement

बच्चू कडू यांनी सांगितले की,  राज्याचे मुख्य सचीव आणि मंत्रालयाच्या काही सूचना आहेत. या सूचनांना घेऊन मी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर शनिवार आणि रविवारी लॉकडाऊनचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply