Take a fresh look at your lifestyle.

लस घेतानाही आठवलेंना सुचली कविता; वाचा, त्यांची ही भन्नाट कविता

मुंबई :

Advertisement

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ‘गो कोरोना गो’चा नारा दिलेल्या आठवले यांनीही आता कोरोना लस घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनीही लस घेतली.    

Advertisement

जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस ; आज आहे माझा सुदिन कारण मी घेतले आहे कोवॅक्सिन असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन आठवले यांनी केले. त्यांनी जे. जे. रुग्णालयात कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला.

Advertisement

आज है मेरा अच्छा दिन, मैने लिया है कोवॅक्सिन, असे म्हणत त्यांनी दुसरी एक ओळीची कविताही प्रसिद्ध केली आहे. आठवले  यांनी सांगितले की, राज्यात मोठे सार्वजनिक कार्यक्रम गर्दी चे कार्यक्रम बंद करावेत.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे; मास्क वापरावा; सॅनिटाईझर चा वापर करावा कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत.    

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply