Take a fresh look at your lifestyle.

केली रस्त्यावर लावणी, झाली व्हायरल; रिक्षाचालकाचं ‘असं’ पालटलं नशीब

सातारा :

Advertisement

नटरंग चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी या लावणीनं अनेकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता ही लावणी खूप जवळपास सर्वत्र डान्ससाठी केली जात होती. एका रिक्षावाल्यानं ही लावणी भररस्त्यात केली आणि नागरिकांचीच नाही तर सोशल मीडियावर युझर्सची मनही जिंकली आहेत. 

Advertisement

या रिक्षावाल्याच्या दिलखेच अदा पाहून युझर्सही लयभारी अशी प्रतिक्रिया देत आहेत. त्याचे हावभाव आणि त्याच्या अदांपुढे तर भलेभले गार पडतील असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या रिक्षावाल्या तरुणानं मला जाऊ द्या ना घरी लावणीवर तुफान डान्स केला. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Advertisement

वाजले की बारा गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकास आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.

Advertisement

आज अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळे यांची भेट घेत त्यांना आगामी दोन चित्रपटात काम करण्यासंदर्भात करारही केला, असं घनशाम येडे यांनी सांगितले.

Advertisement

व्हायरल व्हिडीओनंतर थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानं बाबजी कांबळे यांनीही आनंद व्यक्त केलाय. आपण नक्कीच चांगलं काम करुन दाखवू असंही त्यांनी सांगितलंय.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply