परभणी :
राज्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रुग्णवाढीमध्ये सध्या नागपूर आघाडीवर असलं तरी आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक कऱण्यात आले आहेत. पुण्यात रात्रीची संचारबंदी आहे. मात्र आता मुंबईचीही वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने असल्याचे दिसत आहे.
अशातच राज्यात अजून एका जिल्ह्यात कडक लॉकडाउन होणार आहे. आता परभणी जिल्ह्यात दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन होणारा परभणी हा दुसरा जिल्हा आहे.
दोन दिवस परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन असणार असून यामध्ये 13 आणि 14 मार्चला लॉकडाऊन राहणार आहे. या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन चालू होणार असून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती समजत आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!