Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अंबानींच्या घरासमोरील कार प्रकरणाला धक्कादायक वळण; गाडीचे मालक निघाले ‘हे’ व्यक्ती

मुंबई :

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर ज्यांची स्कॉर्पिओ सापडली होती, त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह (High Tide And Low Tide Timings) मुंब्रा रेतीबंदर परिसरात 5 मार्च रोजी आढळून आला होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. 

Advertisement

या प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलेले असताना एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की ही गाडी ठाण्यातील कार डेकोरेटर व्यापारी मनसुख मिश्रालाल हिरेन (Mansukh Hiren Case) यांची आहे. पण पण या गाडीचे खरे मालक हिरेन नसून सॅम पीटर न्यूटन (Sam Peter Newton) नावाची एक व्यक्ती आहे असा खुलासा तपासात झालेला आहे.

Advertisement

अशीही माहिती समोर येते आहे की, न्यूटन यांनी दिलेले दोन बँकेचे चेकही बाऊंस झाले यामुळे हिरेन आणि न्यूटन यांच्यात वाद देखील झाला होता. बऱ्याच वेळा संपर्क करून देखील न्यूटन यांनी पैसे न दिल्यामुळे हिरेन यांनी त्यांची तक्रार पोलिसात करण्याची धमकी दिली होती.

Advertisement

साधारणपणे एप्रिल 2018 या दिवशी मनसुख हिरेन आणि सॅम पीटर न्यूटन यांची ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये भेट झाली होती. यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवर दोघांमध्ये वादही झाले.

Advertisement

नेमकं काय होतं प्रकरण :-

Advertisement

2016 मध्ये सॅम पीटर न्यूटन याने गाडीमध्ये सजावट करण्याच्या अनुषंगाने आहे ती गाडी मनसुख यांच्या क्लासिक डेकोरेटर याठिकाणी दिली होती. त्यांनी गाडीत जवळपास साडेतीन लाख रुपयांचे काम करून घेतले आणि 2 लाख 80 हजार रुपये न्यूटन हे मनसुख यांना देणार होते. मात्र काही कारणास्तव 2 लाख 80 हजार रुपयांची उर्वरित रक्कम मनसुख यांना देण्यास न्यूटन यांना जमले नाही.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply