Take a fresh look at your lifestyle.

कधीच न ऐकलेला शरद पवारांचा ‘हा’ किस्सा वाचून अंगावर येईल काटा; ऐका त्यांच्याच शब्दांत

शरद पवार हे आज लाखो लोकांची प्रेरणा आहेत. पण त्यांची प्रेरणा कोण आहे हे सांगताना ते नेहमीच आपल्या आईचे म्हणजेच शारदाबाई पवार यांचे नाव घेतात. एकदा एका मोठ्या नेत्याने सांगितले होते की, जर तुम्हाला शरद पवार समजून घ्यायचे असतील तर आधी शारदाबाई पवार यांना समजून घ्यावे लागेल.

Advertisement

शरद पवार एके ठिकाणी भाषणात सांगत होते की, माझ्या राजकीय वाटचालीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदासह केंद्रात मंत्री झालो, आजवर १४ निवडणूका लढलो परंतु सुदैवाने एकही निवडणूक हरलो नाही. या सगळ्यामागे जर कुणाची प्रेरणा होती तर ती माझ्या आईची होती.

Advertisement

ज्या काळी महिला राजकारणात नव्हत्या. तेव्हा माझी आई काँग्रेसच्या चळवळीत काम करत होती. तेव्हाच्या डिस्ट्रिक लोकल बोर्डाच्या निवडणुकीत महिला उमेदवार मिळत नसल्याने पक्षाने माझ्या आईला निवडणूक लढवायला सांगितले. तिने निवडणूक लढली आणि ती निवडूनही आली.

Advertisement

एके दिवशी तिला पुण्यात एका बैठकीसाठी बोलावलं. फक्त चार दिवस आधीच ती बाळंतीन झाली होती. चार दिवसांच्या बाळाला घेऊन ती पुण्यात गेली आणि बैठकीला हजर राहिली. “तेव्हा चार दिवसांची बाळांतीन बाई आपल्या बाळाला घेऊन बैठकीला येते” याचा आदर्श सगळ्यांनी ठेवा, असे लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी सगळ्यांना सांगितले.

Advertisement

त्या बाईच्या अवघ्या चार दिवसांचे बाळ होते आणि त्याचे नाव शरद पवार.

Advertisement

(हा किस्सा स्वतः शरद पवार यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात सांगितला होता. त्यावेळी त्यांच्या “लोक माझे सांगाती” या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला गेला होता.)

Advertisement

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. दरम्यान विधानसभेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती.

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची भाजपच्या (BJP) तीव्र विरोधानंतर बदली करण्यात आली आहे. वाझे यांच्या बदलीचे आदेश मुंबई पोलीस (Mumbai Police) मुख्यालयातून अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत. 

Advertisement

सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मनसुख हिरेन प्रकरणानंतर भाजपने त्यांना अटक करण्याची थेट मागणी केली होती. मात्र पुन्हा नव्या माहितीनुसार तेथूनही सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याचा अर्थ एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. 

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. जी गाडी सापडली त्या गाडीचा मालक हा ठाण्यातील असल्याचे पुढे आले.

Advertisement

त्यानंतर मनसुख  हिरेंन यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी लाऊन धरली. अखेर गृहमंत्र्यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. 

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply