Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… सचिन वाझेंबाबत ठाकरे सरकारने बदलला निर्णय; वाचा, एकाच दिवसात वाझेंसाठी किती झाली धावपळ

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. दरम्यान विधानसभेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मनसुख हिरेन प्रकरणानंतर भाजपने त्यांना अटक करण्याची थेट मागणी केली होती.

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची भाजपच्या (BJP) तीव्र विरोधानंतर बदली करण्यात आली आहे. वाझे यांच्या बदलीचे आदेश मुंबई पोलीस (Mumbai Police) मुख्यालयातून अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत. 

Advertisement

मात्र पुन्हा नव्या माहितीनुसार तेथूनही सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याचा अर्थ एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. 

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. जी गाडी सापडली त्या गाडीचा मालक हा ठाण्यातील असल्याचे पुढे आले.

Advertisement

त्यानंतर मनसुख  हिरेंन यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी लाऊन धरली. अखेर गृहमंत्र्यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. 

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply