अकोला :
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पुण्यात लॉकडाउन लागला नसला तरीही तिथे नियम कडक करण्यात आलेले आहेत. अशातच एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे.
महाराष्ट्रात सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे आता विदर्भातील अकोला येथे 12 मार्च म्हणजे आज शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाउन लावण्याची घोषणा केली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सगळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हे लॉकडाऊन आज रात्री आठ वाजल्यापासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. आवश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहाणार आहे. तर, पेट्रोल आणि डिझेलही केवळ अत्यावश्यक सेवेतील गाड्यांनाच दिलं जाणार आहे.
दरम्यान पनवेलमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात रविवारी (14 मार्च) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी (17 मार्च) (Dhule District Four Days Janata Curfew) पहाटे सहा वाजेपर्यंत असा एकूण 4 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळ्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष