Take a fresh look at your lifestyle.

‘त्यानंतरही’ राहिला महिला प्रेग्नेंट; महिलेने मागितलेली रक्कम वाचून व्हाल शॉक

दिल्ली :

Advertisement

शश्रक्रिया हे अत्यंत किचकट काम आहे. म्हणून तर त्यासाठी नेहमी एक्स्पर्ट लोकांची गरज असते. मात्र बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये एका महिलेचे नसबंदीचे ऑपरेशन झाले. आणि त्यानंतर चक्क ही महिला पुन्हा प्रेग्नेंट झाली असल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

या प्रकारामुळे ही महिला आणि तिचे कुटुंबिय हे आश्चर्यचकित झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सुरूवातीला सांगितले होते. बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.

Advertisement

नसबंदी केल्यानंतरही एक महिला गरोदर रहिली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली असून 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.  29 जुलै 2019 रोजी फुलकुमारी यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन नसबंदी केली होती. पण दोन वर्षानंतर फुलकुमारी पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. या प्रकरणी फुलकुमारी यांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार केली आहे.

Advertisement

दरम्यान रुग्णालयाने आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, एखाद्यावेळी अशी शस्त्रक्रिया अयशस्वी होऊ शकते. दरम्यान नियमाप्रमाणे शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर सदर व्यक्तीला 30 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. आणि रुग्णालयाने ही रक्कम देण्याची तयारी दाखवली आहे.

Advertisement

तसेच रुग्णालयाने शस्त्रक्रिया होण्यापूर्वी फुलकुमारी यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आहे. त्यांना 30 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.       

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply