दिल्ली :
कोरोनाचे सावट असतानाही नियम आणि निर्बंधांचे पालन करत महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने एका कार्यक्रमात ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार आहेत. त्यांना शिवाचे वरदान मिळाले आहे’, असा दावा हिमाचल प्रदेशातील मंत्री सुरेश भारद्वाज यांनी केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी या संकटाला ज्या पद्धतीने तोंड दिले, ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. पंतप्रधान मोदींना महादेव शंकराचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान मोदी हे महादेवांचे रुप आहे. त्यामुळेच देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं.
हिमाचल प्रदेशातील एक मंत्री सुरेश भारद्वाज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. पंतप्रधान मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती