Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : म्हणून पुन्हा एकदा सविनय कायदेभंग..!

आजच्या दिवशी 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये मिठाचा सत्याग्रह करत दांडी मार्च काढला होता. सविनय कायदेभंग करत गांधीजींनी देशभरामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात रान उठवले होते. ‘तुम्ही केलेला अन्याय कारक कायदा आम्ही म्हणणार नाही,’ असे ठणकावून सांगत महात्मा गांधीजींनी आपल्या हजारो अनुयायांसह सविनय कायदे भंग केला होता.

Advertisement

महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे महाविकासआघाडी सरकार ही ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल टाकते की काय अस वाटण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. केंद्र सरकार तर ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल ठेवून कारभार करत आहेच.

Advertisement

कोरोनासोबत जगायला शिकायला हवं, असे सांगणारे लॉकडाउन करायचा आग्रह धरत आहेत. लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरवून व्यापारी वर्गाने मातीमोल किमतीने शेतकर्‍यांचा माल विकत घेतला आहे पण तोच माल चढ्या भावाने ग्राहकांना विकत आहेत. लॉकडाऊनमुळे एक वर्ष वाया गेलय. पुन्हा आता सरकार लॉकडाउनच्या तयारीत आहे. मग प्रश्न निर्माण होतात एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलं ? आरोग्य सुविधेमध्ये आपण काय सुधारणा केल्या ? किती नवे दवाखाने तयार केले ? कोरोना सोबत लढण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज आहे ? मग मधल्या काळात नेमकं आपण केलं ?

Advertisement

रडतखडत, धडपडत, आर्थिक संकटांना तोंड देत, छोटे-मोठे व्यवसाय पुन्हा सुरू झाले होते. आता पुन्हा लॉकडाउनच्या चर्चेमुळे सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. शेतकऱ्यांचे तर किती कोटींचे नुकसान झाले याची काहीही मोजमाप नाही. आणि आता पुन्हा लॉक डाऊन होणार या चर्चेमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यवसायिक, उद्योजक सगळेच हवालदिल झाले आहेत.

Advertisement

मास्क वापरत, सुरक्षित अंतर ठेवत, आपण आपला रोजचा दिनक्रम चालू ठेवायला हवा. जर का राज्य शासनाने पुन्हा लॉक डाऊन केलं तर सरकारच्या विरोधात सविनय कायदे भंग करत आपण आपलं काम सुरू ठेवायला हवाय. लॉक डाऊनमुळे उपाशी मरण्यापेक्षा सरकारच्या गोळीने मरण आलं तर कधीही चांगलं. सरकारनेही जनसामान्यांच्या भावनांची दखल घेत लॉकडाऊन सारखा दुर्दैवी निर्णय घ्यायला नको आहे अन्यथा सरकारसोबत सामान्य नागरिकांचा संघर्ष अटळ आहे. पुन्हा एकदा गांधीजींची आठवण करत सविनय कायदेभंग यासाठी आपण तयार व्हायला हवाय !

Advertisement

लेखक : ब्रम्हा चट्टे (मुक्त पत्रकार व सामाजिक अभ्यासक, पुणे)

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply