Take a fresh look at your lifestyle.

मेक इन इंडिया : अखेर मोदींनी करून दाखवले; भारतात बनवला जाणार आता ‘तो’ ब्रॅंड

मुंबई :

Advertisement

Apple Inc भारतात आयफोन 12 मॉडेलची असेंब्ली सुरू करीत आहे. या कामामुळे अमेरिकन कंपनीची देशातील स्थिती बळकट होण्याची अपेक्षा आहे. Appleने फॉक्सकॉन आणि विस्ट्रोनसारख्या भारतातील थर्ड पार्टी उत्पादकांशी करार केला आहे. यात आयफोन एसई(iPhone SE), आयफोन 10 आर(iPhone 10R) आणि आयफोन 11(iPhone 11) यांचा समावेश आहे.

Advertisement

Apple ने निवेदनात म्हटले आहे की, Apple जगातील सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा तयार करण्यासाठी समर्पित आहे, जे आमच्या ग्राहकांना आनंदित करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या क्षेत्रीय ग्राहकांसाठी आयफोन 12 ची निर्मिती सुरू केल्याचा त्यांना अभिमान आहे.

Advertisement

एकूणच काय तर PM नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया या मोहिमेला थेट Apple ने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता अनेक लोक ‘अखेर मोदींनी करून दाखवले’ असे म्हणार आहेत.

Advertisement

प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सॅमसंग आणि वनप्लससारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार्‍या Appleने भारतात आपली उपस्थिती वेगाने वाढवली आहे. जानेवारीत Appleचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक म्हणाले की कंपनीने ऑनलाइन स्टोअरमध्ये केलेल्या कामगिरीमुळे डिसेंबर तिमाहीत त्याचा व्यवसाय दुप्पट झाला. टेक कंपनीची भारतामध्ये चांगली वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply