Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात आक्रमक; ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल करत दिला ‘हा’ इशारा

शिरूर :

Advertisement

लोकसभा निवडणुकी दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून 3 वेळा शिरूरचे खासदार राहिलेले शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून अभिनेते, डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्यात लढत झाली. अमोल कोल्हे हे विजय मिळवत खासदार झाले.

Advertisement

नंतर पुढे महाविकास आघाडी सरकार अस्तीत्वात आले आणि राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले. असे असले तरीही शिरूर लोकसभा मतदारसंघात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीचा छत्तीसचा आकडा आहे. अधूनमधून काहीतरी कुरबुरी या मतदारसंघातून ऐकायला येत असतातच. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर गुरुवार (दि.11) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी दिली. त्यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून काही वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या. 

Advertisement

याप्रकरणी सोशल मीडियावर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.   

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply