Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अन्नसाखळी धोक्यात आलीय धोक्यात; पहा शेतीवरही काय होतील दुष्परिणाम

पुणे :

Advertisement

यंदा नेहमीप्रमाणे उन्हाळा न येता अगोदरच जोरदार उष्णता आणि पर्यावरणीय बदलाचे घटक आपल्या सर्वांवर परिणाम-दुष्परिणाम करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, यात आणखी एक संशोधन पुढे आले असून अन्नसाखळीच धोक्यात येण्यासह शेतीवर याचे होणारे दुष्परिणाम अधोरेखित झालेले आहे.

Advertisement

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू भारतीय उपखंडात आहेत. त्याचे चक्र योग्य पद्धतीने फिरले तरच शेतीमध्ये आताचे उत्पादन होने किंवा उत्पादनवाढ शक्य आहे. मात्र, आता उन्हाळा जास्त कालावधीचा तर, हिवाळा खूप कमी कालावधीचा झाल्याने एकूण प्राणी आणि वनस्पती यांच्याच जीवनचक्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

जिओफिजिकल रिसर्च लेटर या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात भीती व्यक्त करण्यात आलेली आहे की, उन्हाळा सहा महिन्यांचा, हिवाळा दोन महिन्यांचा तर पावसाळा चार महिन्यांचा असे ऋतुचक्र होण्याची शक्यता आहे. पुढील फ़क़्त 100 वर्षांमध्ये असे चित्र आपल्या सर्वांना पाहायला मिळेल.

Advertisement

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर गोलार्धातील भूमध्य प्रदेश व तिबेटच्या पठार परिसरात ऋतुचक्रातील हे बदल ठळक दिसतात. फुलोऱ्यासाठी सरासरी १५ ते २० अंश सेल्सियस तापमान आवश्यक असेलल्या आणि हिमालयात १५०० ते ३६०० मीटर उंचीवर आढळणाऱ्या ऱ्होडोडेंड्रॉन या सदाहरित वृक्षाला साधारणत: मार्च-एप्रिलमध्ये फुलोरा येतो. मात्र यंदा जानेवारीतच ही झाडे फुलोऱ्यात आली.

Advertisement

संशोधकांच्या १९५२ ते २०११ या काळातील निरीक्षणांनुसार हिवाळ्याचे दिवस ७६ वरून ७३ पर्यंत घटून उन्हाळा थेट ७८ दिवसांवरून ९८ दिवसांपर्यंत लांबला आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे चक्राकार जीवन बदलाने, वनस्पतीचे लवकर फुलोऱ्यात येणे, लवकर फळधारणा होणे असे परिणाम किंवा दुष्परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे. अन्नासाठी त्यावर अवलंबून प्राणी हे समीकरण जुळेनासे झाल्याने पर्यावरणातील अन्नसाखळीच धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply