Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ठाकरे सरकार कोसळण्याच्या चर्चेला आलेय उधाण; पहा कोणत्या घडामोडी आहेत केंद्रस्थानी

पुणे :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल आणि भाजपला सत्तासोपान चढण्याची संधी मिळण्याची शक्यता सध्या अनेकांना वाटत आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडीचे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला पाचवेळा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारावर ओढवली आहे. भले त्यासाठी करोनाचे वाढते संक्रमण हा मुद्दा असो. मात्र, निवडणूक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम जोमात होत असतानाच परीक्षा रद्द करून काय हशील होणार हा विद्यार्थी आणि पालकांसाठी कळीचा मुद्दा बनेल आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे युवा नेते सरकारच्या विरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहेत.

Advertisement

तर, दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात संघ मुख्यालयी सरसंघचालकांची भेट घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांसोबत त्यांची अर्धा तास चर्चा झाली. तत्पूर्वी राज्याचे माजी वने व महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सत्ता बदलाचे सूचक वक्तव्य केले. 

Advertisement

संधी नसतानाही जबरदस्ती, बेईमानी करून हे सरकार महाराष्ट्रात राज्य करत आहे. सरकार कसे पडेल हे आताच सांगितले तर ते सावध होतील. त्यामुळे त्यांना सावध कशाला करू असे छातीठोकपणे सांगतानाच सरकारमधील काही लोक बाहेर पडतील आणि सरकार पडेल, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पुन्हा केले आहे.

Advertisement

अशा पद्धतीने वेगवान घडामोडी आणि प्रशासकीय चुका याद्वारे राज्य सरकार डळमळीत केले जात असल्याचा संशय महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांना वाटत आहे. त्यामुळेच हे सरकार राहणार की जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply