Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दोन दिग्गज मराठमोळ्या माणसांमुळे धोनी बनला होता कर्णधार..!

पुणे :
भारताला टी २० विश्वचषक, वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स टॉफी असे तीन किताब जिंकुन देणारा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंह धोनी कर्णधार होण्यामागे दोन मराठमोळ्या माणसांचा हात आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हो दोन मराठमोळ्या माणसांमुळेच धोनीची कर्णधारपदी वर्णी लागली.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ साली टी २० विश्वचषक तर २०११ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. २००७ साली त्याला भारताचं कर्णधारपद देण्यात आले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयामुळे सर्वांनाच
आश्चर्य वाटले. राष्ट्रवादीचे प्रमुख आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतला होता.
धोनीला कर्णधारपद देण्याबाबतचा किस्सा पवार यांनी नुकताच रांची येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितला. ते म्हणाले की, त्यावेळी कर्णधार असलेल्या राहुल द्रविडने फलंदाजीवर परिणाम होत असल्याने हे पद सोडणार असल्याचे सांगितले. तेव्हा पवार यांनी सचिनला कर्णधारपद घेण्यास सांगितले. मात्र सचिननेही हे
पद घेण्यास नकार दिला. मग पवारांनी सचिनला विचारलं की कोणाला कर्णधारपद दिले पाहिजे. तेव्हा सचिनने हे पद धोनीला देण्यास सांगितले. आणि मग पुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे.
धोनीला कर्णधार करण्याचा निर्णय पवारांनी घेतला. या निर्णयाची कडाडून टीका झाली. मात्र पुढे धोनीने हा निर्णय सार्थ ठरवला. धोनीच्या कर्णधारपदाबाबत सचिनने केलेली शिफारस आणि पवारांनी घेतलेला निर्णय यामुळे धोनीच्या नेतृत्वाला बहरण्यास संधी मिळाली. तसंच भारतीय क्रिकेटलाही धोनीच्या नेतृत्वात अच्छे दिन पहावयास मिळाले.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply