Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ माजी क्रिकेटपटूला मिळणार उपमुख्यमंत्रीपदाची संधी; पहा नेमके काय असेल राजकीय नियोजन

दिल्ली :
भारतीय संघातील माजी खेळाडूस एका राज्याचा उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळू शकते अशी चर्चा सुरु असून काही राजकीय विश्लेषकांनीही या बाबीला दुजोरा दिला आहे. अशी संधी मिळणारा तो माजी क्रिकेट खेळाडू आहे नवज्योतसिंग सिध्दू.
पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० मार्च रोजी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे समजते. अडीच वर्षांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मंत्रिमंडळ सोडणारे नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची तयारी करत आहेत. विभाग किती महत्त्वाचा असेल किंवा पूर्वीप्रमाणेच ऊर्जा व सांस्कृतिक मंत्रालय सिद्धू यांना मिळणार का? हे अद्याप सांगता येणार नाही, परंतु सिद्धू यांना उपमुख्यमंत्री बनविण्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे.
सिद्धूसोबतच पुढील एक वर्षासाठी एक दलित चेहऱ्यास मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे बोलले जाते, जेणेकरून राज्यातील ३२ टक्के दलित मतदारांना सोबत घेवून कॉंग्रेसला २०२२ च्या विधानसभा निवडणुकांचा विजय निश्चित करता येईल. पंजाबमधील दोआबा आणि माझा भागात मोठ्या संख्येने दलित मतदार आहेत, त्यामुळे या भागांमधून एक दलित चेहरा मुख्यमंत्री बनवता येईल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्यात चंडीगड येथील पंजाब भवन येथे झालेल्या चर्चेदरम्यान रावत यांनी सिद्धू यांच्यासमवेत कॉंग्रेसच्या भावी निवडणुकीच्या रणनीतीबद्दल सविस्तर चर्चा केली. बजेट अधिवेशनानंतर कॉंग्रेस सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत निर्णय घेईल, असे रावत यांनी आधीच सांगितले होते.

Advertisement

दरम्यान, या भेटीबद्दल रावत म्हणाले की, सिद्धू यांच्याशी त्यांची ही औपचारिक भेट होती. तथापि, यापूर्वी रावत यांनी स्पष्ट केले आहे की सिद्धू राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्षासाठी काम करतील की राज्यस्तरावर कोणती जबाबदारी स्वीकारतील हे लवकरच ठरवले जाईल. राहुल गांधी यांनी सोपविलेली जबाबदारी स्वीकारतील असे खुद्द सिद्धू यांनीही स्पष्ट केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply