Take a fresh look at your lifestyle.

बाप रे : ५ वर्षात तब्बल ‘इतक्या’ आमदारांनी केला कॉग्रेसला रामराम..!


दिल्ली :

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआर संस्थेने केलेल्या एका पाहणी अहवालात एक माहिती समोर आली असून त्यानूसार २०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल १७० आमदारांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पक्षांतर केल्याची बाब पुढे आली आहे. तर गेल्या ५ वर्षात १८ भाजप आमदारांनी पक्षांतर केलं आहे.

Advertisement

या अहवालातून पुढे आलेल्या माहितीनूसार २०१६ ते २०२० या दरम्यान आपल्या पक्षाला सोडून पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर ३८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदारांनी तेलंगना राष्ट्र समितीत प्रवेश केला.

Advertisement

पाच वर्षात पाच खासदारांनी भाजपला रामराम करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी हे खासदार इतर पक्षात गेले होते. तर राज्यसभेच्या सात खासदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.

Advertisement

काँग्रेसच्या आमदारांची पक्षांतर केल्याचा परिणाम मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमध्ये प्रकर्षाने दिसून आला. कारण या राज्यात काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे त्या राज्यातील काँग्रेसच्या सरकारला पायउतार व्हावे लागले होते.

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून ममता विरुध्द भाजप असा हायहोल्टेज ड्रामा पहावयास मिळत आहे. बंगालमध्येही भाजपने ममता यांच्या तृणमल कॉग्रेसचे आमदार फोडण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

तिथे आतापर्यत ५ आमदारांनी तृणमल कॉग्रेसची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. बंगालचा निकाल समोर आल्यावरच पक्षांतर करणाऱ्यांचा निवडणुकीवर काय परिणाम झाला हे दिसून येईल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply