Take a fresh look at your lifestyle.

करोनावरून केंद्राची महाराष्ट्राला तंबी; आणि मोदी सरकारने ठाकरे सरकारला दिले महत्वाचे निर्देश..!

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोनाची आकडेवारी राज्यासह देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. गुरुवारी ११ मार्चला १४ हजार हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद राज्यात करण्यात आली. यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले १० पैकी ८ जिल्हे हे फक्त महाराष्ट्रातील असल्यामुळे हा गंभीर विषय बनला आहे.
राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसून आला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र केंद्र सरकारनं यामागचं कारण काय आहे ते सांगितलं असून आकडेवारीत होत असलेल्या वाढीला नवा व्हायरस नव्हे तर तुम्हीच जबाबदार आहात, असं म्हणत केंद्र सरकारने महाराष्ट्राला झापलं आहे.
सध्या देशात पावणे दोन लाखांहून अधिक ॲक्टिव्ह कोरोना केसेस असून केरळमध्ये ॲक्टिव केसेस कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तसंच देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत.
केंद्रानं महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट असल्याचं सांगत हा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा परिणाम नसून कमी प्रमाणात टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगमध्ये कमतरता आणि कोरोना नियमांचं उल्लंघन, बेजबाबदारपणा हेच यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. यासाठी बेजबाबदार राहू नका आणि कोरोनामुक्त राहायचं असेल तर कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता गरज पडल्यास काही ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला असून याबाबत दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply