Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात ‘या’ 4 जिल्ह्यात आहे पावसाचे संकट; ‘तिथे’ पावसामुळे शेतकरी चिंतेत

मुंबई :

Advertisement

सध्या कधी ऊन तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका काही पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.  

Advertisement

हवामान विभागानं महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. 

Advertisement

पूर्व विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भात विशेषता भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

दिल्लीमध्ये आज दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वीचं हवामानाचा अंदाज वर्तवला होता. जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वातावरण बदललं असून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply