Take a fresh look at your lifestyle.

2 दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर

मुंबई :

Advertisement

गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने तेजी होती. लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने पाहत होते. लॉकडाउनच्या काळात वाढलेले दर अजूनही कमी झालेले नव्हते.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Advertisement

शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 291 रुपयांनी कमी होऊन 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचा दर तब्बल 1,096 रुपयांनी कमी होऊन 65,958 रुपये प्रति किलो झाला.

Advertisement

या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तप्पल पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतात सोन्याचे दर कमी होत आहेत.

Advertisement

कारण भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करतो. भारतात आठ महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते, आता त्यामध्ये घट होऊन सोन्याचे दर 44 हजार रुपयापर्यंत कमी झाले आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply