Take a fresh look at your lifestyle.

आगामी टी २० वर्ल्ड कपचा ‘तो’ असेल प्रबळ दावेदार; विराटने दिले हे उत्तर

मुंबई :
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी -२० मालिका शुक्रवारपासून (दि.१२) सुरू होत असून पाच सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेत दोघेही संघ तुल्यबळ असल्याने प्रेक्षकांना चांगले क्रिकेट सामने पहावयास मिळणार आहेत. या मालिकेच्या प्रारंभी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एका प्रश्नाच्या उत्तराने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
पत्रकाराने विराटला विचारले की, भारताता होणाऱ्या आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेचा विजेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार संघ कोणता ? यावर विराटने इंग्लंड असे उत्तर दिले. याबाबत तो पुढे म्हणाला की, इंग्लंड हा नंबर एक टी -२० संघ आहे आणि ते विश्वचषक जिंकण्याचे दावेदार आहेत. इंग्लंडच्या संघाने मे २०१९ नंतर कोणतीही टी २० मालिका गमावली नाही. इंग्लंडने परदेशातही चमत्कार केले असून त्यांनी श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला २ वेळा पराभूत केल्याचे तो म्हणाला.
विराटला पत्रकारांनी अश्विन टी -२० मालिकेपासून का बाहेर आहे ? असंही विचारलं. त्यावर विराट म्हणाला की, अश्विन टी २० संघात नाही कारण वॉशिंग्टन सुंदर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तसंच केएल राहुल रोहित शर्माबरोबर ओपनिंगला येईल की शिखर धवन? असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. तेव्हा कोहली म्हणाला की, केएल राहुल रोहित शर्मासोबत ओपनिंगला जाईल कारण तो काही काळापासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
टी २० मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवतिया, ईशान किशन (राखीव यष्टीरक्षक).
इंग्लंड: ओयन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टोपली, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply