PM केअर्स फंडासाठी मुकेश अंबानींनी दिले ‘एवढे’ कोटी तर टाटांनीही केली बरोबरी; आकडा वाचून व्हाल शॉक
मुंबई :
मधल्या काळात पीएम केअर्स फंडाची रक्कम किती झाली? तिथे कुणी कुणी देणगी दिली? या पैशाचा वापर कसा झाला?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती. आता ही माहिती समोर आली असून अंबानी, टाटा यांच्यापासून तर बँकांनी किती निधी दिला आहे, हेही समोर आले आहे.
पीएम केअर्स फंडासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडून ५०० कोटी रुपये, रतन टाटा यांच्या टाटा समूहाकडून ५०० कोटी रुपये, आदित्य बिर्ला ग्रुपकडून ४०० कोटी रुपये आणि अदानी ग्रुपकडून १०० कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे पीएम केअर्स फंड :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संकटाशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत आणि सहकार्य निधी म्हणजेच पीएम केअर्स फंडासाठी निधी दिला जात अहोता.
खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांकडूनही पीएम केअर्स फंडासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले. ICICI बँक यात आघाडीवर असून, बँकेकडून या फंडासाठी ८० कोटी रुपये, HDFC बँकेकडून ७० कोटी रुपये, कोटक महिंद्रा बँकेकडून २५ कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय बँकेतील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून जमा झालेले १.९ कोटी रुपयेही पीएम केअर्स फंडासाठी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा