Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीच्या ‘या’ पक्षानेच केला MPSCच्या निर्णयाला विरोध; आता आपल्याच सरकारविरोधात उतरणार मैदानात

अहमदनगर :

Advertisement

अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत पुण्यात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.

Advertisement

दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाने MPSCच्या निर्णयाला विरोध केला आहे. एवढेच नाही तर नगर शहरात आणि इतरही काही ठिकाणी काँग्रेस सरकारच्या या निर्णयाविरुद्ध मोर्चाही काढणार आहे.

Advertisement

नगर शहर काँग्रेसने या निर्णयाविरोधात आक्रमक होत थेट मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

काँग्रेसनं मात्र हा परीक्षेचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. या आधी 3 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 11 ऑक्टोबर 2020 ला नियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 14 मार्चला होणार होती, पण वाढत्या कोव्हिड रुग्णसंख्यंमुळे ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

Advertisement

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटले की, हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे.     

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply