Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून सापडला HUL चा बनावट माल; हत्याप्रकरणाला मिळाले वेगळेच वळण

अहमदनगर :

Advertisement

अनेक कंपन्यांचे बनावट आणि बोगस माल सध्या बाजारात मिळतात. ऑफरच्या नावाखाली ग्राहक ओढण्यासाठी किंवा जास्त नफा कमावण्याच्या अट्टाहासाने अनेक व्यापारी व दुकानदार असे करतात. असाच प्रकार आता श्रीरामपूर भागात उघडकीस आलेला आहे. दुर्दैवाने त्याला निमित्त ठरले आहे ते एका व्यापाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाचे..!

Advertisement

व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या अनुषंगाने तपासादरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हरचा बनावट माल कोल्हार येथील तीनचारी येथे आर टी एजन्सीज या दुकानात लोणी पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी रेवणनाथ गुलाब तायडे (वय ३१, कोल्हार बुद्रुक तीनचारी), दीपक शहाजेन (रा गोंधवणी रोड श्रीरामपूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

हिंदुस्थान युनिलिव्हरचे मॅन्युफॅक्चरिंग नसलेले मात्र या कंपनीचा बनावट लोगो व ट्रेडमार्क तयार करून इथे उत्पादनांची विक्री केली जात आहे. ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे प्रोडक्ट जवळ बाळगून कॉपीराईट व ट्रेड मार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

हिंदुस्थान युनिलिव्हरचे डिलर हिरण यांच्या हत्येे प्रकरणाच्या अनुषंगाने तपासादरम्यान हे वेगळेच प्रकरण पुढे आलेले आहे. त्यामुळे हा बनावट माल कुठून आला, कोण तयार करीत आहे, याचा मुख्य मास्टरमाइंड कोण या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांची टीम शोधत आहे.

Advertisement

क्लिनिक प्लस शॅम्पू पाऊच, हिंदुस्थान युनिलिव्हरचे अधिकृत उत्पादन नसल्याचा संशय आल्याने शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव व प्रभारी अधिकारी सपोनि समाधान पाटील यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. हिरण यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार यातूनच सापडण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply