Take a fresh look at your lifestyle.

गुंठेवारीपासून मुद्रांक शुल्क दरापर्यंत ‘ही’ 6 विधयके झाली संमत; वाचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली महत्वाची माहिती

मुंबई :

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये सहा विधेयके संमत करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता, गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी वाढविणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक ही  सहा विधेयके संमत करण्यात आली.

Advertisement

(१)    सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 1 –   महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021 (सन २०२१ चा महा. अध्या. क्र. १ ) (बॅकांशी संबंधित साधे गहाण खत आणि हक्कविलेख-निक्षेप (इक्वीटेबल मॉरगेज), तारण किंवा तारणगहाण यासंबंधीच्या दस्त तथा संलेख यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतूदीनुसार आकारणी करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता आणण्याकरिता अधिनियमाच्या कलम 5 मध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2015 रोजीच्या भूतलक्षी प्रभावाने तर उक्त अधिनियमात जोडलेल्या अनुसूची-1 मधील अनुच्छेद ६ व अनुच्छेद ४० मध्ये सुधारणा करणेबाबत) (महसूल व वन विभाग)   (पुर:स्थापित दि. 02.03.2021, विधानसभेत संमत दि. 03.03.2021, विधानपरिषदेत संमत दि.04.03.2021)

Advertisement

(२)    सन 2021 चा विधानसभा विधेयक क्र. 2 – महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, 2021 (दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी अस्तिवात असलेली गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत तरतूद करण्याबाबत) (नगर विकास विभाग) (पुर:स्थापित दि. 02.03.2021, विधानसभेत संमत दि. 03.03.2021, विधानपरिषदेत संमत दि.04.03.2021)

Advertisement

(३)    सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 3- महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2021 (विधानसभेत संमत दि. 04.03.2021, विधानपरिषदेत संमत दि.04.03.2021)

Advertisement

(४)  सन 2021 चा विधानसभा विधेयक क्र. 4 – महाराष्ट्र  महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021, (कोविडच्या प्रार्श्वभूमीवर निवडणुका घेणे शक्य नाही असे निवडणूक आयोगाकडून कळविले असेल तेव्हा नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी निवडणूक आयोगाने कळविलेल्या कालावधीसाठी वाढविणे किंवा प्रशासकांची नियुक्ती करणे) (नगर विकास विभाग) ( पुर:स्थापीत  दि. 04.03.2021, विधानसभेत संमत दि.05.03.2021, विधानपरिषदेत विचारार्थ दि. 08.03.2021, 09.03.2021, विधानसभेत संमत दि. 09.03.2021)

Advertisement

(५)    सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 5 –  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक, 2021  (कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत) (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग) (पुर:स्थापित  दि. 05.03.2021, विधानसभेत विचारार्थ दि. 08.03.2021, 09.03.2021, विधानसभेत संमत दि. 09.03.2021, विधानपरिषदेत संमत दि. 10.03.2021)

Advertisement

(६) सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्र. 6- महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2021 (पुर:स्थापित दि. 10.03.2021, विधानसभेत संमत दि. 10.03.2021, विधानपरिषदेत संमत दि.10.03.2021)

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply