Take a fresh look at your lifestyle.

अमित ठाकरेही मैदानात; ठाकरे सरकारला केली ‘ही’ मागणी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेलीय. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Advertisement

परिणामी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती आणि इतर शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

Advertisement

अशातच आता आमदार रोहित पवार, युवा नेते सत्यजीत तांबे यांच्यानंतर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेही मैदानात उतरले आहेत. परीक्षा दोन दिवसांवर असताना सरकार परीक्षा पुढे ढकलू शकत नाही, असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटलंय. तसेच, राज्यात विद्यार्थी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत.

Advertisement

उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रुपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही त्यांनी केला. 

Advertisement

एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी ते रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?,” असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय.

Advertisement

अनेक विद्यार्थ्यांचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न असतो. ते एज बार होऊ शकतात. 14 तारखेच्या परीक्षा घ्यायलाच पाहिजेत. परीक्षा 3 दिवसांवर असताना सरकार अचानक असे निर्णय घेऊ शकत नाही,” असे अमित ठाकरे म्हणाले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply