Take a fresh look at your lifestyle.

कुठे विद्यार्थ्यांचा धिंगाणा तर कुठे विद्यार्थी रस्त्यावर; बघा, संपूर्ण महाराष्ट्रात कुठे काय आहे परिस्थिती

मुंबई :

Advertisement

१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांनी नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून रास्तारोको सुरू केला आहे.

Advertisement

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला रास्तारोको केला होता. पण एका बाजूची वाहतूक पोलिसांनी सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

Advertisement

लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पुणे, कोल्हापूर, जळगाव अशा शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. 

Advertisement

सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विध्यार्थी आणि विद्यार्थीनी अपस्थित होत्या.

Advertisement

पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरु असतानाच औरंगाबाद शहरातील औरंगपुरा,गुलमंडी या भागातील शेकडो विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले चौकात एकत्र आले.व जोरधार घोषणाबाजी करीत परीक्षा त्वरित घेण्याच्या मागणी साठी मुख्य रस्ता अडविला.  

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply