Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ माजी मुख्यमंत्रीही उतरले आपल्याच सरकारच्या विरोधात; अधिवेशन, लग्न, भरत्या होतात मग MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ?

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.

Advertisement

राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करु नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, परंतु आता या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Advertisement

अधिवेशन, लग्न समारंभ, आरोग्य विभागाच्या भरती होतात मग MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Congress Prithviraj Chavan) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे MPSC परीक्षांचा निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेण्यात आलं होतं की नव्हतं असा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement

अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

Advertisement

‘यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!’ असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply