Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बड्या नेत्यांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर; रोहित पवारांसह ‘या’ नेत्यांनीही ठोकला सरकारविरोधात शड्डू

मुंबई :

Advertisement

अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Advertisement

‘यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!’ असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Advertisement

‘एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे’, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply