Take a fresh look at your lifestyle.

पाठदुखीने केले नको नको; ‘या’ सवयी बदला आणि पाठदुखी पळवा

पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी एवढे बेफिकीर राहतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रास जास्त होतो. 

Advertisement

पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते. ती वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो. 

Advertisement

अनेक जणांना बैठे कामाची सवय असते. किंवा काही जण जाणीवपूर्वक बैठे कामाला प्राधान्य देतात. तसेही आजकाल सगळीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे तासनतास बसून काम करण्याची सर्वाना सवय जडली आहे. परिणामी पाठदुखी, कंबरदुखी आणि वजन वाढत आहे.

Advertisement

व्यायामाची कमी, दैनंदिन आहारात फास्टफूडचा समावेश या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर परिणामकारक ठरत आहेत. अनेकांना पाठदुखीने नकोनकोसे करून सोडले आहे. यावर अनेक जन घरगुती उपाय वापरतात. उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे. ती म्हणजे आपल्या सवयींमध्ये बदल करणे. काही सवयी बदलणे गरजेचे आहे.

Advertisement
  1. ट्रेनमध्ये मान तिरकी करून झोपणे, जेवणानंतर लगेच कोणत्याही स्थितीत झोपणे, मोठय़ा उशा घेऊन वाचत बसणे, तसेच झोपणे, मान मोडत बसणे, सतत मान हलवत रहाणे, या सवयी टाळा.
  2. घरात टीव्हीवर कार्यक्रम पाहाताना, लॅपटॉप किंवा मोबाइल फोन वापरताना तुम्हाला बसण्याचं भान राहत नाही. त्यावेळी तुम्ही कसेही बसता. नेहमी शरीराला आराम वाटेल अशाच स्थितीत बसा.
  3. कामामुळे किंवा इतर कारणांमुळे सातत्याने एकाच पोजिशन मध्ये तासनतास बसत असाल तर तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्यला सामोरं जावं लागेल. शक्य असल्यास बसण्याच्या पद्धती बदला किंवा दर तासाला १० मिनिटे का होईना चाला, फिरा.
  4. कधीकधी आपण अवाक्याबाहेरचं वजन उचण्याचा प्रयत्न करतो, अशावेळी कंबरदुखी/पाठदुखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
  5. अनेकजन व्यायाम शाळेत चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात, असा लोकांना पाठदुखी आणि कंबरदुखीसारक्या समस्येला सामोरं जावं लागते.
  6. रस्त्यावरील गतिरोधक, रस्त्यातील खड्डे, दुचाकी वाहनांवर जास्त फिरणे या कारणांनी मणक्यांवर अधिक ताण पडून गादीला इजा पोहोचते.
  7. आराम मिळतो म्हणून आपण अतिशय मुलायम किंवा सॉफ्ट गादीवर झोपतो. पण मुलायम गादीवर झोपण्यामुळे स्पाइन पोजीशन खराब होऊ शकते. त्यामुळे तुमची पाठदुखी वाढू शकते.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply