Take a fresh look at your lifestyle.

शिळी चपाती टाकून देताय; त्याआधी ही माहिती नक्कीच वाचा…

शिळे अन्न म्हटले की, आपल्यापैकी अनेक जन तोंड वाकडे करतील. तर काही लोक खुश होतील. कारण अनेकांना शिळे अन्न आवडत नाही तर काही लोकांना रात्रीच्या भाज्या सकाळी गरम करून खायला खूप आवडतात.  

Advertisement

एकूणच काय तर शिळे आवडते किंवा आवडत नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र अनेकदा शिळे हे शरीरास चांगले नसते, असे समजून ते खात नाहीत. अनेकदा आपण भाजी मात्र मोजून मापून करतो, मात्र चपात्या/पोळ्या किती कराव्या यांचा अंदाज येत नाही.  

Advertisement

म्हणूनच बहुतांश घरी रात्रीचे अन्न उरते, त्यात प्रामुख्याने चपाती असते. जी सकाळी कडक होते. शिळे अन्न खाण्यासाठी चांगले नसते असे म्हटले जाते म्हणून आपण बऱ्याचदा शिळ्या चपात्या टाकून देत असतो किंवा दुधवाल्याच्या गायी/म्हशीला खायला देतो. पण खरं पाहता बारा ते चौदा तास आधी बनवण्यात आलेली चपाती ही हानीकारक नाही. तसेच शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत.
१) शिळ्या चपातीमध्ये अनेक पोषणमुल्ये आणि उर्जा ताबडतोब मिळते त्यामुळे ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती हेल्दी आहे.
२) शिळ्या चपातीत कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम दूर होतात.
३) ब्लड प्रेशरच्या समस्येनं त्रस्त असाल तर शिळ्या चपातीला थंड दुधात १५ मिनिटं भिजवून खा.
४) मधुमेही व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यात थंड दुध घालून खावं. दुधात साखर घालणे टाळावे.
५) उन्हाळ्यात शिळी चपाती दुधात भिजवून खाल्ल्यानं उष्माघाताचं त्रास कमी होतो.
६) अॅसिडीटी, गॅस आणि पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी शिळी चपाती खावी.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply