Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांतदादा… तुमच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय; ‘या’ शिवसेना नेत्याने दिली मोठी ऑफर

मुंबई :

Advertisement

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात विविध मुद्दयांवर चर्चा चालू होती. दरम्यान संपूर्ण अधिवेशन काळात भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भावरील अन्यायाच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर विदर्भावर अन्यायाची भाषा करताना संपूर्ण अधिवेशनात पश्‍चिम महाराष्ट्रातील आमच्या चंद्रकांत दादांना एकदाही बाोलण्याची संधी दिली नाही हा पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय नाही का असा प्रश्‍न करीत चंद्रकांतदादा तुम्ही आमच्याकडे या, असे खुले निमंत्रण आमदार लांडे यांनी दिल्याने काही काळ सभागृहात हशा पिकला होता.

Advertisement

विदर्भावर अन्याय होत असल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात अनेकवेळा केली आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने पण चांगलेच प्रत्युत्तर शिवसेनेचे मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी दिले आहे. आमदार लांडे यांच्या या निमंत्रणाने सभागृहात एकच हशा पिकला होता.

Advertisement

भाजपच्या धोरणाप्रमाणे सभागृहात चंद्रकांत पाटील फारसे बोलत नाहीत. सभागृहात बोलण्याची मुख्य जबाबदारी ही मुनगंटीवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सर्वच दिवशी विविध मुद्दयावरून प्रामुख्याने हे दोनच नेते बोलत असतात. 

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply