Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ऑफलाईन सभेपासून काढला जातोय पळ; पहा भाजपने नेमका काय आरोप केलाय

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यावर भाजपने हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवर अजिबात चर्चा न होण्यासाठी ही पळवाट शोधली गेल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

२६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा ऑनलाईन व ऑफलाईन झाली होती. त्या सभेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतीसह १४ सदस्य सभागृहात उपस्थित होते. तर ३९ सदस्य व पंचायत समिती सभापती ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. त्याचवेळी राज्यात १० दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन पार पाडले गेले आहे.

Advertisement

तोच मुद्दा पकडून जालिंदर वाकचौरे (गटनेते, भाजप) यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पीय सभा ही ऑफलाइन घ्यावी. सभा ऑनलाइन नकोच. पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही सभा ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याचे अधिवेशन १० दिवस चालते, तर अर्थसंकल्पीय सभा तीन तासांसाठी ऑफलाइन का चालत नाही. जिल्हा परिषद पदाधिकारी ऑनलाइन सभेच्या नावाखाली पळवाट काढत आहेत.

Advertisement

दरम्यान, २६ मार्चला दुपारी २ वाजता ऑनलाइन सभेला सुरुवात होणार आहे. अध्यक्ष राजश्री घुले या ऑनलाइन व ऑफलाइन सभेत अर्थ संकल्प सादर करतील. सभेतच अर्थसंकल्पाचे पुस्तक देण्यात येईल. ऑफलाईन सभेतच असतील त्यांना सभागृहातच तर, जे सदस्य ऑनलाइन सभेत सहभागी असतील, त्यांना पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये सभा सुरू होण्यापूर्वी हे पुस्तक दिले जाणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply