Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांनी केले असे ‘काम’; ज्यामुळे सर्वच पक्षांचे आमदार झाले भलतेच खुश

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या संकटकाळात आमदारांच्या वेतनात केलेली ३० टक्के कपात मागे घेत असल्याचे व १ मार्चपासून त्यांचे वेतन पूर्ववत करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले.

Advertisement

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड होता. लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबले होते. शिवाय राज्य खासदार फंडही दोन वर्षांसाठी स्थगित केला होता. महाराष्ट्रातील सरकारला करातून मिळणारे उत्पन्नही थांबले होते. केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात केली होती. यानंतर राज्यानेही आमदारांच्या पगारातही 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 अशी एका वर्षासाठी ही कपात लागू करण्यात आली होती.

Advertisement

आमदार निधी तीन कोटी रुपयांहून ४ कोटी रुपये करण्यात येत असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्यामुळे अजितदादांच्या या निर्णयावर सर्वच पक्षांचे आमदार खुश झाले. या निर्णयाचे सर्वच पक्षांनी स्वागत केले.

Advertisement

आता नवीन घोषणेनुसार प्रत्येक आमदाराला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाच सर्वपक्षीय आमदारांनी स्वागत केलं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply