Take a fresh look at your lifestyle.

आय्यो.. सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आले बनावट जात प्रमाणपत्र; पहा कितीला ‘लुटलेय’ सरकारला..?

नाशिक :

Advertisement

बनावट जात प्रमाणपत्र तयार करून नोकऱ्या लाटणारे या अख्ख्या महाराष्ट्रात लाखो आहेत. अनेकजण अगोदरच पकडले जातात, तर काहीजण अखेरपर्यंत याद्वारे सरकारला लुटतात. असाच एक प्रकार आता उघडकीस आला आहे. हे प्रकरण आहे नाशिक विभागातील.

Advertisement

आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त नंदुरबारच्या कर्मचाऱ्याचे हे प्रकरण आहे. मूळ गुजरातचा असलेल्या सत्तारसिंह वसावे यांनी ही किमया केली आहे. महाराष्ट्रातील नसताना नंदुरबार पडताळणी समितीचे हे प्रमाणपत्र सादर करून राज्याच्या सेवेत दाखल होण्याचे हे प्रकरण आहे. वसावे हे आता सेवानिवृत्त झाल्यावर हे गंभीर प्रकरण उघडकीस आलेले आहे.

Advertisement

याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त नंदुरबारच्या कर्मचाऱ्याचे जात वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवत रद्द केले आहे. या व्यक्तीचेच एमएस-सीआयटीचे प्रमाणपत्रही बनावट असल्याचे उघड झाले होते.

Advertisement

शासकीय सेवेत आरक्षित संवर्गातून रुजू होताना जात पडताळणी समितीने प्रमाणित केलेले प्रमाणपत्रही बंधनकारक असते. तसेच ती व्यक्ती राज्यातील मूळ रहिवासी असावी लागते. असे दोन्ही नियम बासनात गुंडाळून ठेवत फसवणूक करून वसावे यांनी नोकरी पूर्ण केली आहे.

Advertisement

वसावे यांनी नोकरीत वेळोवेळी अाश्वासित प्रगती योजनांचे, वेतनवाढीचेही लाभ घेतले. आता हेच प्रमाणपत्र रद्द झाल्याने राज्य शासनाकडून घेतलेल्या वेतनासह इतर आर्थिक लाभ घेतले आहेत. पगार घेतला आहे. आता तो पगार वसूल केला जाणार किंवा नाही हे लवकरच समजेल. दरम्यान, सेवानिवृत्तीचे ११ लाख ४२ हजार ८०५ रुपये संबंधित व्यक्तीला दिले जातात का याकडे महामंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply