मुंबई :
सध्या मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा समाज आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता भाजप खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज व मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत.
आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणार्यांनी शेकडो वर्षे या समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवले आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहीत धरून सत्तेवर बसणार्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला.
इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे व कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मात्र मेखा मारून बसले आहेत. अलीकडे होत असणार्या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही, असाही आरोप उदयनराजेंनी केला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय