Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. बँकांनी केली १.१५ लाख कोटींची कर्ज राईट ऑफ; बुडीत खाती म्हणून झाली नोंद

दिल्ली :

Advertisement

एकीकडे शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीवर बँका, वित्तसंस्था आणि सरकारचे कसे कंबरडे मोडले आहे याच्या बातम्या पेरल्या जात असतानाच मागील फ़क़्त एकाच वर्षात बँकांनी तब्बल १.१५ लाख कोटींची कर्ज राईट ऑफ केली आहेत.

Advertisement

काेराेनाकाळात गेल्या ९ महिन्यांत बँकांनी वसुली न झालेली १.१५ लाख कोटी रुपयांची कर्जे (एनपीए) निर्लेखित (राइट अाॅफ) केल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

Advertisement

ठाकूर यांनी लाेकसभेत ही माहिती देताना सांगितले की, निर्लेखित केलेल्या कर्जाच्या वसुलीची प्रक्रिया बँका सुरूच ठेवतील. आरबीआयचे दिशानिर्देश आणि बँक बोर्डांच्या स्वीकृत धोरणानुसार एनपीए वा बॅड लोन बुडीत खाती टाकून ती संबंधित बँकेच्या बॅलन्स शीटमधून हटवली जातात. कर्जधारकांनी गेली ४ वर्षे कर्जफेड न केल्यास ते एनपीएत जाते.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, कमर्शियल बँकांनी वर्ष २०१८-१९ मध्ये २.३६ लाख कोटी रुपये, २०१९-२० मध्ये २.३४ लाख कोटी आणि २०२०-२१ च्या तीन तिमाहीत १.१५ लाख कोटी रुपयांची कर्जे बुडीत खाती काढली आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती कर्ज बुडीत खाती झाल्यावर वसूल झाली याची आकडेवारी मात्र कुठेही समजलेली नाही. त्यामुळे हे कर्ज वसूल होतात किंवा नाही, हाच कळीचा मुद्दा बनला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply