Take a fresh look at your lifestyle.

म्हणून नगर तालुक्याला मिळणार नवे कारभारी; पहा सभापती-उपसभापती पदावर कोणाला मिळणार संधी

अहमदनगर :

Advertisement

राजकारणात दिलेला शब्द पाळणारे खूप कमी असतात. एकमेकांचा घात करण्याच्या या राजकीय काळात नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी शब्द पाळून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Advertisement

पंचायत समिती मध्ये सव्वा वर्षानंतर सभापती आणि उपसभापती पदांची खांदे पालट होणार हे अगोदरच ठरले होते. त्यानुसार सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापति रवी भापकर यांनी पक्षश्रेष्ठींना राजीनामा सुपूर्द केला आहे.

Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी सभापती संदेश कार्ले व बाळासाहेब हराळ यांच्या बैठकीत हा सव्वा-सव्वा वर्षांचा फॉम्युला ठरला होता. कोकाटे आणि भापकर यांनी शब्दाला जागून राजीनामा दिल्याने आता इतर इच्छुकांना संधी खुली झाली आहे.

Advertisement

पक्षश्रेष्ठींनी राजीनामे मंजूर करत पुढील निर्णय घेतले तर ठरल्याप्रमाणे निंबळक गणाचे डॉ. दिलीप पवार आणि सुरेखा गुंड या सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळू शकते. यंदा सभापतीपद हे महिलेस राखीव आहे. त्यामुळे यात डॉ. पवार यांना उपसभापती, तर गुंड यांना सभापती हेप मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

या निवडीदरम्यान माजी मंत्री व भाजप नेते शिवाजी कर्डिले गट कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply