Take a fresh look at your lifestyle.

अधिवेशन संपताच घाईघाईने फडणवीस-पाटील गेले ‘त्यांच्या’ भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई :

Advertisement

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस या हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले. सचिन वाझे, मनसुख हिरेन अशा अनेक विषयांवरुन त्यांनी महाविकास आघाडीला बॅकफुटवर नेले. या अधिवेशनानंतर विरोधी पक्ष सक्षम असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीसुद्धा फडणवीसांचे कौतुक केले. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

अधिवेशन संपताच विधानसभेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस आणि भाजपचे पदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आज सकाळीच नागपुरात पोहोचले. तिथं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारकडे फक्त तीन महिने राहिले आहेत, असा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कालच दिला होता. त्याच्या या वक्तव्यामुळं वेगळीच चर्चा सुरू झाली.

Advertisement

सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्याचा काळ उरला आहे, असं का म्हटलं असावं? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप अजूनही प्रयत्नशील आहे का? तीन महिन्यांत सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का?’, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply