Take a fresh look at your lifestyle.

अंबानींच्या प्रकरणी पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी स्फोटकप्रकरणी

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायंस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडण्याच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

Advertisement

पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी या प्रकरणाला वेगळीच किनार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2009 मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता. आताही एका इतर कारणासाठी  भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे, पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठीचे हे राजकीय प्रकरण आहे.

Advertisement

राज्यात व देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपनेच या मुद्द्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे. या मुद्यावरून येत्या काळात अाणखी राजकारण होण्याची शक्यता आहे. सहानुभूती मिळावी आणि अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड वापरास परवानगी मिळण्यासाठी भाजप अट्टाहास करीत असल्याचे गंभीर आरोप पटोले यांनी केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply