Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील लॉकडाउनबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा, काय म्हणालेत ते

पुणे :

Advertisement

पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येणार, अशा चर्चा लोकांमध्ये चालू आहेत. महाराष्ट्रात अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पुणे, मुंबई औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनबाबत एक सूचक विधान केले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लावले जाणार नाही, मात्र कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. याचा अंतिम निर्णय शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये होणार आहे.

Advertisement

शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली तर नव्या करोना बाधितांच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉंरंट, मॉल आणि बार बंद ठेवले तर बाधितांची संख्या 20 टक्क्यांनी कमी होईल. जर रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली, तर बाधितांची संख्या 15 टक्क्यांनी घटेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला.     

Advertisement

रोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचवण्यासाठी ‘आयसर’ आणि टाटा संस्थांना अहवाल देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार बुधवारी हा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन महिने शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे, लग्न समारंभ, मॉल, हॉटेल आदी गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावायचे हे उपाय सुचवले आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply