Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर झाला आत्महत्येचा प्रयत्न; नगरच्या व्यक्तीने केला ‘हा’ प्रकार

मुंबई :

Advertisement

अहमदनगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवाशी असणार्‍या पांडुरंग वाघ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Advertisement

पांडुरंग वाघ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ हा आलिशान बंगल्यातील  विशेष कार्यकरी अधिकारी दालनात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. 

Advertisement

काय होती पांडुरंग वाघ यांची मागणी :-

Advertisement

 वाघ यांनी शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. माञ स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी वाघ यांनी हा प्रकार केला.

Advertisement

या प्रकरणी वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना सीआरपीसी 41(1) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करुन जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.  

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply