मुंबई :
सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी (MP Mohan Delkar suicide case) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एफआयआर (FIR) दाखल केला आहे. आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आता आणखी तापणार असल्याचे चिन्ह आहे.
मोहन डेलकर हे दमण आणि दीव या लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून काम करणारे स्वतंत्र राजकारणी होते. आत्महत्येच्या दिवशी डेलकर हे मुंबईतील ग्रीन साऊथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चालकाने फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र तो झाला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळवलं.
कुटुंबियांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, अखेर पोलिसांना कळवण्यात आले, त्यानंतर त्यांच्या चालकाने शेजारच्या रुममधील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारल्यानंतर डेलकर यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं होत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक बड्या अधिकार्यांची आणि मंत्र्यांची नावे आहेत. ही नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र या नावांचा डेलकर यांच्या आत्महत्येशी थेट संबंध असण्याची शक्यता आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी
- दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!