Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सचिन वाझे यांना केले जातेय लक्ष्य; संजय राऊतांनी उपस्थित केले ‘ती’ महत्वाची शंका

मुंबई :

Advertisement

सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक महत्वाची शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला आहे. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांसाठी न्यायच झालाच. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत.

Advertisement

पुढे बोलताना राऊत सांगितले की, टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझे यांना लक्ष्य केलं जातंय याच्यामागे त्यांनी या दोन प्रकरणाचा छडा लावला. या दोन प्रकरणात आरोपी तुरुगांत टाकले, हा एक विषय असू शकतो.

Advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. सचिन वाझे यांच्या मुद्यावरुन विधिमंडळात भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी महाविकासआघाडी याप्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply