Take a fresh look at your lifestyle.

आक्रमक प्रवीण दरेकरांचा ‘त्यांना’ सवाल; सचिन वाझे तुमचा जावई आहे का?

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. याच मुद्द्यावरुन विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरु असून बुधवारी विधानपरिषदेतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर सचिन वाझे आपला जावई आहे का ? अशी विचारणा करत सभापती निलम गोऱ्हेंसमोर संताप व्यक्त केला.

Advertisement

‘सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

Advertisement

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटीलही यावरून आक्रमक झालेले आहेत.  आता जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प, अशी भूमिका घेत पाटील यांनी थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

Advertisement

फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? मनसुख हिरेनची पत्नी सचिन वाझेवर का संशय घेत आहे?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असे एकामागून एक प्रश्नांनी सरबत्ती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply