Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे खडसेंना वाटतेय अटक व्हायची भीती; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

Advertisement

भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे. पुणे येथील भोसरी भूखंड हडपल्याप्रकरणी ‘ईडी’ने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर इसीआयआर नोंदविला होता. दरम्यान खडसे हे ‘ईडी’च्या तपासाला सहकार्य करत होते.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर ‘खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर त्यांना अटक करण्याची आवश्यता काय?’ असा सवाल उच्च न्यायालयाने ‘ईडी’ला सोमवारी केला.

Advertisement

दरम्यान आता खडसे यांनीही अटक होण्याची भीती असल्याची भावना व्यक्त केली आहे.  ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानंतरच सक्तवसुली संचालनालय (इडी) माझ्या मागे लागले. पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ‘ईडी’ने चौकशी सुरू केली. म्हणूनच ‘ईडी’कडून अटक होण्याची माझ्या मनात भीती आहे,’ असा युक्तिवाद खडसे यांच्या बाजूने करण्यात आला आहे.

Advertisement

खडसे म्हणाले की, या प्रकरणात २०१६मध्ये एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून २०१८ मध्ये आरोपांत तथ्य नसल्याचे म्हणणारा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. तोपर्यंत इडीचा या प्रकरणात कधीही हस्तक्षेप नव्हता.

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, मात्र, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्याचे ठरवून ऑक्टोबर-२०२०मध्ये तशी पावले उचलल्यानंतरच अचानक इडीचा या प्रकरणात शिरकाव झाला. त्यापूर्वी इडीने मला कधीही चौकशीसाठी बोलावले नव्हते. म्हणूनच या तपाससंस्थेकडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply